मोसमी पाऊस ६ दिवस आधीच अंदमानात दाखल; केरळमध्ये २५ ते २७ मेपर्यंत, तर कोकणात २ जूनला आगमन 

अंदमानाच्या समुद्रात सोमवारी मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारी दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळात तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

पुणे : अंदमानाच्या समुद्रात सोमवारी मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारी दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात आल्याने केरळात तो २५ ते २७ मे, तर तळकोकणात २ जूनपर्यंत येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरवर्षी अंदमानात र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन २२ ते २४ मे दरम्यान होते, तर केरळमध्ये मोसमी पाऊस १ ते ३ जूनला दाखल होतो. मात्र यंदा र्नैऋत्य मोसमी वारे अंदमानातच सहा दिवस आधी येऊन धडकले. ते आता वेगाने पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकत आहेत. हवामानतज्ज्ञांच्या मते यंदा र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता ते तळकोकणात ८ ते १० जूनऐवजी २ ते ३ जूनला येण्याची शक्यता आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमान तीन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

आज मुसळधार?

महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत १७ ते १९ मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

१३ जिल्ह्यांना इशारा

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या १३ जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monsoon rains arrive andaman 6 days advance arrive in kerala in konkan 2nd june ysh

Next Story
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक ; तज्ज्ञांचा सल्ला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी