मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मशीद रोड स्थानकादरम्यानचा कॅरनाक पूल पाडण्याच्या कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात येणार असून, पुणे विभागातून जाणाऱ्या इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. १९ आणि २१ नोव्हेंबरलाही पुणे विभागातील वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत असणार आहे.

हेही वाचा- विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट; काँग्रेसचा छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेलला पाठिंबा

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

पूल पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री करण्यात येणार आहे. परिणामी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत विविध गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे. या कालावधीत लांब पल्ल्याच्या विविध गाड्या पुणे स्थानकापर्यंतच धावणार आहेत. २० नोव्हेंबरला मात्र पुणे विभागातील आणि पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • १९ नोव्हेंबरला पुणे विभागातील रद्द गाड्या : पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई हुसैन सागर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस.
  • २० नोव्हेंबरला पुणे-मुंबई दरम्यानच्या रद्द गाड्या : पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस. मुंबई-हैदराबाद हुसैन सागर एक्स्प्रेस.
  • २० नोव्हेंबरला दादरवरून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस (१९ नोव्हेंबर), मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस, मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, मुंबई-चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस. (१८ नोव्हेंबरला भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस दादरपर्यंत धावेल)
  • २० नोव्हेंबरला पुण्याहून सुटणाऱ्या गाड्या : मुंबई-बंगळुरु उद्यान एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, मुंबई-गदग एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस.
  • १९ नोव्हेंबरला दादरवरून सुटणाऱ्या गाड्या : पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, चेन्नई-सेंट्रल-मुंबई एक्स्प्रेस, बिदर-मुंबई एक्स्प्रेस, हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस. (२० नोव्हेंबरला पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावेल)
  • १९ नोव्हेंबरला पुण्यापर्यंतच धावणाऱ्या गाड्या : गदग-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, तिरुवनंतपुरम-मुंबई एक्स्प्रेस, बंगळुरु-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (२० नोव्हेंबर).