पुणे : सिगारेट घेण्यासाठी आईने २० रुपये न दिल्याने आईला मारहाण करणाऱ्या मुलाच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी माधव राजाराम कांबळे (वय २७) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सखुबाई राजाराम कांबळे (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव काही कामधंदा करत नाही. त्याने आई सखुबाई यांच्याकडे सिगारेटसाठी २० रुपये मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्याची भावाशी वादावादी झाली. सखुबाई यांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. माधवने आईच्या हातावर बांबू मारला. मारहाणीत आईचा हात फ्रॅक्चर झाला.