ससून रुग्णालयात नवजात अर्भक सोडून आई पसार

ससून रुग्णालयात प्रसूत झालेली महिला तिचे नवजात अर्भक सोडून पसार झाली. गुरुवारी ( १४ जानेवारी ) ही घटना घडली.

ससून रुग्णालयात प्रसूत झालेली महिला तिचे नवजात अर्भक सोडून पसार झाली. गुरुवारी ( १४ जानेवारी ) ही घटना घडली.
याप्रकरणी शीतल अर्जुन राठोड (वय २५, रा. सेवानगर तांडा, ता. चाळीसगांव, जि. जळगांव ) हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक किरण साबळे यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शीतल साबळे ही ९ जानेवारी रोजी ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २३ मध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली. प्रसूत झाल्यानंतर शीतल हिने गुरुवारी ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २३ मध्ये तिचे नवजात अर्भक सोडून दिले. सायंकाळी वॉर्डातील परिचारिकेच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. समाजसेवा अधीक्षक साबळे यांनी  पोलिसांकडे तक्रार दिली असून, उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mother flight her child in sasoon hospital