सावत्र आईने मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले

सावत्र आईने अल्पवयीन मुलीला वीस हजारात दलालाला विकल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

सावत्र आईने अल्पवयीन मुलीला वीस हजारात दलालाला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. दलालाने मुलीला बांगलादेशातून आणून पुण्यात वेश्याव्यवसायात ढकलले. पोलिसांनी कात्रज परिसरात छापा टाकून या अल्पवयीन मुलीची सुटका केली.
याप्रकरणी बांगलादेशातील सावत्र आईसह सोहेल आणि त्याचा साथीदार अशा दोन दलालांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी मूळची बांगलादेशातील आहे. गेल्या महिन्यात मुलीची सावत्रआई तिला पुण्यात घेऊन आली. पुणे रेल्वे स्थानकावर ६ जून रोजी सावत्र आईने सोळा वर्षांच्या मुलीला दलाल सोहेल याला वीस हजारांत विकले. त्यानंतर सोहेल याने तिला कात्रज परिसरात नेले. तेथे त्याने साथीदाराकडे मुलीला ठेवले. एका इमारतीत तिला डांबून ठेवण्यात आले. साथीदाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास दुसऱ्या दलालाला तुझी विक्री करू, अशी धमकी त्याने दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mother forced her minor daughter into prostitution

ताज्या बातम्या