मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या, शेतकरी, अडत्यांचे नुकसान

कृषी उत्पन्न बाजार समितीने मार्केट यार्ड परिसरात बेकायदा लिंबू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केल्याने दलित पँथर संघटनेकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने शेतकरी आणि अडत्यांचे नुकसान झाले. बाजार समितीने बघ्याची भूमिका घेतल्याने शेतीमाल विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. रविवारी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होते.

हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या कार्यालयातील टेबल, खुर्च्या चोरीला; भांडार कक्षाचे कुलूप तोडून चोरी

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डाच्या आवारातील डमी अडते (बेकायदा अडते), लिंबू विक्रेत्यांमुळे वाहतूक विस्कळीत होते. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या डमी अडते शेतकऱ्यांकडून कमी भावात शेतीमाल खरेदी करुन चढ्या भावाने विक्री करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. गाळ्यांसमोर विक्री केल्याने कोंडीत भर पडतले. बाजार समितीने दोन ते तीन महिन्यांपूर्वी लिंबू विक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यांना बाजारात प्रवेशास मज्जाव केला होता. मात्र, बेकायदा अडत्यांवर कारवाई करण्यात आली नव्हती. दलित पँथरचे यशवंत नडगम यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी (२९ जानेवारी) सकाळी सहा वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे : हाॅटेल व्यावसायिकाकडे दोन लाखांची खंडणी मागणारे गजाआड

त्यामुळे बाजारात शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्रासाला सामाेरे जावे लागले. रविवारी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी असते. आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडल्याने शेतकरी आणि खरेदीदार दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाजार आवारात गेले. पाच ते सहा तास ठिय्या आंदोलन सुरू होते. बाजार न झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. आंदोलन सुरू असताना बाजार समितीने बघ्याची भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया बाजार आवारातील घटकांनी व्यक्त केली.

मार्केट यार्डातील मुख्य प्रवेशद्वारासमोर रविवारी सकाळी चार ते पाच तास आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्याचा अधिकार आंदोलकांना आहे. मात्र, मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल घेऊन बाजारात येता आले नाही. खरेदीदारांना त्रास सहन करावा लागला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले.- सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटना

Story img Loader