scorecardresearch

Premium

पिंपरी : आंदोलनाच्या गुन्ह्यात खासदार बारणे यांच्यासह चौघे निर्दोष

पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधातील आंदोलनाच्या गुन्ह्यातून खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

MP Barne agitation
पिंपरी : आंदोलनाच्या गुन्ह्यात खासदार बारणे यांच्यासह चौघे निर्दोष (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पिंपरी : शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधातील आंदोलनाच्या गुन्ह्यातून मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भगवान वाल्हेकर, भाजपाचे एकनाथ पवार, नामदेव ढाके यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा १२ वर्षांपूर्वी ऐरणीवर आला होता. महापालिका प्रशासनाने बांधकामांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली होती. शहरातील नागरिक, कष्टकऱ्यांवर बेघर होण्याची वेळ आली होती. या कारवाईविरोधात मुंबई, नागपूर विधानभवनावर भव्य मोर्चा काढला होता. महापालिका, तसेच तत्कालीन प्राधिकरण कार्यालयावरही मोर्चे काढले होते. महामार्ग रोखणे, गर्दी जमवणे, गर्दीचे नेतृत्व करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, भाजपाचे एकनाथ पवार, नामदेव ढाके यांच्यावर मावळ, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.

rohit pawar, hunger strike, Sangli, lift irrigation project
पाण्यासाठी उपोषण की राजकीय श्रेयवादाची लढाई ?
Eligibility determination campaign
गिरणी कामगार, वारसांच्या पात्रता निश्चितीचे अभियान आता वांद्र्यातील समाज मंदिर सभागृहात
Cidco
सिडकोची फसवणूक प्रकरणी शिरीष घरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल 
ravindra waikar
रवींद्र वायकर यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा

हेही वाचा – पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार

याबाबतचा खटला वडगाव आणि पिंपरी न्यायालयात सुरू होता. १० वर्षांपासून त्यावर सुनावणी सुरू होती. पोलिसांच्या तपासातील त्रुटी, प्रतिबंधक आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. तपास व्यवस्थित झाला नसल्याचा युक्तिवाद ॲड. सुशील मंचरकर यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने खासदार बारणे यांच्यासह चौघांची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा – धक्कादायक! ‘लेझर बीम’मुळे पुण्यात १५ जणांच्या डोळ्यांना इजा, पुण्यातील विविध रुग्णालयांत नोंद; कायमस्वरूपी दृष्टी जाण्याचा धोका

अनधिकृत बांधकामधारकाला न्याय मिळावा, शास्तीकर सरसकट माफ व्हावा यासाठी आंदोलन पुकारले होते. न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या असल्या, तरी शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना न्याय देऊ शकलो. सरसकट शास्तीकर माफ करण्यात यश मिळाले. – श्रीरंग बारणे, खासदार

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mp barne along with four acquitted in the crime of agitation pune print news ggy 03 ssb

First published on: 03-10-2023 at 10:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×