भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आजारी खासदार गिरीश बापट सक्रिय झाले आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत कसब्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा केसरीवाड्यात मेळावा सुरू झाला आहे. आजारी असल्याने बापट यांनी पत्र दिले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘खूप काम करा, कसब्यात विजय नक्की आहे’ असा संदेश दिला आहे.

हेही वाचा- पुणे : शिवनेरीवर महाशिवआरतीला ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांना पाठवा; विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना

‘त्यांना’ रामभक्त जागा दाखवतील; ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
CM Eknath Shinde
“…म्हणून त्यांचा टांगा पलटी करावा लागला”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

मेळाव्यास भाजप उमेदवार हेमंत रासने, निवडणूक प्रचार प्रमुख, आमदार माधुरी मिसाळ, माजी खासदार प्रदीप रावत, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे. संघटन सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते. भाजपकडून बापट यांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच बापट जाहीरपणे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतल्यानंतर चोवीस तासातच बापट यांच्या उपस्थितीत मेळावा होत आहे.

हेही वाचा- पुणे : तीन वर्षांच्या वेदांशीचे परदेशात शिवस्तुतीपर पोवाडे गायन; लहान वयात कविता, पोवाडा गाण्याचा विक्रम

आमदार म्हणून गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदार संघाचे तब्बल तीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते पुण्याचे खासदार असून प्रकृतीच्या कारणास्तव पोटनिवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले नव्हते. तसे प्रसिद्धी पत्रकही बापट यांनी जाहीर केले होते. बापट यांचे प्रचारातील महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट यांची भेट घेतली होती. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने बापट यांनी काही महत्वाच्या सूचना केल्याचे आणि बापट कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या कामाला लागल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर बापट यांच्या उपस्थितीत केसरीवाड्यात गुरूवारी मेळावा होत आहे. त्याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.