scorecardresearch

Premium

‘मावळ’वरील भाजप, अजित पवार गटाच्या दाव्यावर खासदार बारणे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’…

आजमितीला माझ्यासमोर कोणीही इच्छुक नाही. मी येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आहे असे म्हटलो तर कोणाच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे. – खासदार श्रीरंग बारणे

MP shrirang barne, parth pawar, Shiv sena, NCP, Maval lok sabha constituency
'मावळ'वरील भाजप, अजित पवार गटाच्या दाव्यावर खासदार बारणे म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी'…

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून महायुतीकडून माझ्या उमेदवारीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार मीच असून माझा विजय देखील निश्चित असल्याचा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. भाजपाच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे असे मला वाटत नाही म्हणत बाळा भेगडे यांना टोला लगवितानाच नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर सुनील शेळके यांचा विश्वास नाही का? असा सवालही केला.

शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदार असलेल्या बारणे यांच्या मतदारसंघावर महायुतीतील मित्र पक्ष भाजप आणि अजित पवार गटाकडून दावा केला जात आहे. त्याला उत्तर देताना खासदार बारणे म्हणाले, महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांपैकी माझी आघाडी निर्णायक असेल. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काय काम केले हे जनतेला सांगेल. कोणीतरी राजकीय द्वेषातून, सुडापोटी मला काय काम केले असे विचारत असेल तर त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही. माझी बांधिलकी मतदारांशी आहे. आमदार सुनील शेळके यांचे व माझे राजकीय किंवा वैयक्तिक कसलेच मतभेद नाही. पण त्यांनी माझ्यावर आरोप का केले, कोणी त्यांना बोलायला लावतंय का? हे बघावं लागेल.

indi Alliance
“इंडिया आघाडीत फूट पडलेली नाही”; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा! भाजपा फूट पाडत असल्याचाही गंभीर आरोप
Nana Patole
“उपोषण सोडवायला मुख्यमंत्री जातात, पण दोन्ही उपमुख्यमंत्री…”, काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
ajit pawar marathi news, ajit pawar rohit pawar, rohit pawar ed notice marathi news,
“आम्ही त्याचा इव्हेंट करत नाही, माझी ५ तास चौकशी झाली…”, रोहित पवारांच्या ईडी नोटीशीवर अजित पवार म्हणाले…
Loksatta lokjagar Although there is still time for the implementation of the code of conduct preparations for the Lok Sabha elections of the political parties have started
लोकजागर: कौल कुणाला?

हेही वाचा… मावळमध्ये अजितदादा पुत्र पार्थ पवारांसाठी जुळवाजुळव?

हेही वाचा… Maharashtra News Live : “त्याचे काय डोळे गेले आहेत का? त्याने…”; एकेरी उल्लेख करत जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

भाजपचे देशातील नेते अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे जे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, त्या जागा त्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण काय बोलते, याला महत्व नाही. भाजपाच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे असे मला वाटत नाही. राष्ट्रवादीला त्यांची ताकद वाढली आहे असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल मागणी करावी. मागील काळात मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दोन लाख मतांनी पराभव केला आहे. आजमितीला माझ्यासमोर कोणीही इच्छुक नाही. मी येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार आहे असे म्हटलो तर कोणाच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे. मी मोदी लाटेवर निवडून आलो हे आमदार शेळके म्हणत असतील. तर, त्यांचा किंवा अजित पवार यांचा नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर विश्वास नाही का? तुम्ही कोणत्या विचारांनी महायुतीत आलात याचेही उत्तर द्यावे, असेही खासदार बारणे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mp shrirang barne statement on ncp claim on maval lok sabha constituency pune print news ggy 03 asj

First published on: 01-12-2023 at 11:05 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×