रस्ते पाहणी दौऱ्यानंतर बैठक घेणार आहेत

हिंजवडी: आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा आज दौरा आहे. विविध भागातील रस्त्यांची त्या पाहणी करत आहेत. सकाळी साडेआठ वाजल्यापासून त्या पाहणी दौऱ्यावर आहेत. सुळे यांनी रस्त्याची पाहणी करताना आयटी अभियंत्यांनी त्यांची व्यथा मांडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या.

सुविधांची वानवा होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावी ही मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असून आयटी अभियंते यावर ठाम आहेत. अखेर रस्त्यांवर तुंबलेले पाणी आणि रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यासाठी थेट आता खासदार सुप्रिया सुळे या रस्त्यावर उतरल्या असून पाहणी दौरा सुरू केला आहे.

सकाळी साडेआठ पासून सुरू झालेल्या दौऱ्याची सुरुवात फेज वन ते माणगाव रस्त्याची पाहणी सुरुवात केली आहे. त्यानंतर फेस तीन मेट्रो स्टेशन कारशेड जवळील रस्त्याची पाहणी, फेस तीन मेगापोलीस या ठिकाणच्या रस्त्याची पाहणी, भोईरवाडी रोड या ठिकाणच्या रस्त्याची पाहणी, फेज दोन मधील मॅकडॉनल्ड्स जवळील रस्त्याची पाहणी आणि मारुंजी रस्ता टी जंक्शन या ठिकाणच्या रस्त्याची पाहणी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहणी दौरा झाल्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायत येथे बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी आयटी अभियंत्यांनी रस्त्यांवर साचत असलेलं पाणी, कचरा आणि रस्त्यांची दुरावस्था यासंबंधी तक्रार केली. हिंजवडीमध्ये काही दिवसांपूर्वी रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं होतं. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील लक्ष घातलं होतं. आज त्या स्वतः येऊन रस्त्याची पाहणी करत आहेत. दौऱ्यामुळे आयटी अभियंत्यांना काही दिवसांमध्ये रस्ते सुसज्ज आणि खड्डे मुक्त होतील अशी अपेक्षा आहे.