पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार, गैरवर्तणूक करून नियमाचे उल्लंघन केलेल्या उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांना एमपीएससीच्या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्याची कारवाई करण्यात आली असून एमपीएससीने एक्स या समाजमाध्यमाद्वारे ही माहिती दिली.

सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा, गट ब २०२२ या भरतीच्या अर्जातील दाव्याच्या अनुषंगाने मुलाखतीच्या वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने अर्जातील दावा खोटा ठरत असताना मुलाखतीस पात्र करावे, याकरीता आयोगाच्या अधिका-यांना धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता २० नोव्हेंबर २०२२ पासून म्हणजेच या परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Supreme Court understanding of Ajit Pawar group regarding use of clock symbol
वृत्तपत्रात निवेदन ठसठशीत छापा! सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला समज
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल

हेही वाचा…‘महाराष्ट्र ड्रोन मिशन’ अंतर्गत राज्यात आता ड्रोन केंद्रांचे जाळे; सहा विभागीय, बारा जिल्हास्तरीय ड्रोन केंद्रांची निर्मिती प्रस्तावित

सचिन नवनाथ बागलाने यांनी ब्लू टूथ हेडफोन बाळगून केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करुन आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या दिनांकापासून पाच वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे. धमकावून आयोगावर प्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याने योगेश उत्तमराव मेतलवाड यांना आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता २० नोव्हेंबर २०२२ पासून म्हणजेच या परीक्षेच्या दिनांकापासून दोन वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.

सुरेश कारभारी बेलोटे या राज्यकर निरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करून बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता प्रस्तुत परीक्षेच्या दिनांकापासून (२३ जानेवारी, २०२३ पासून) २ वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे. केवलसिंग चैंनसिंग गुसिंगे यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ दरम्यान स्वत:जवळ भ्रमणध्वनी व अन्य अनधिकृत साहित्य ठेऊन केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांची प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षाकरीता कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येत आहे.

हेही वाचा…महापालिकेने ‘एसआरए’चा अहवाल दडवला? अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी खटाटोप

बालाजी ज्ञानेश्वर पवार या पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत उमेदवाराने कार्यक्षेत्राबाहेर पदाचा धाक दाखवत आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करुन बेशिस्त वर्तनाद्वारे परीक्षेसारख्या संवेदनशील कामामध्ये जाणीवपूर्वक व कुहेतूने अडथळे निर्माण केल्याबद्दल त्यांची राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ची उमेदवारी रद्द करण्यासह आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीकरीता राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ च्या दिनांकापासून २ वर्ष कालावधीकरीता प्रतिरोधित करण्यात येत आहे.