पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण देखील झाला. मात्र यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निलने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये स्वप्निलने, “मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका असे त्यामध्ये त्याने म्हटले आहे. अधिकारी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल सुनील लोणकर रा. फुरसुंगी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निलच्या वडिलांची शनिवार पेठेत प्रिंटींग प्रेस आहे. स्वप्निलचे आईवडिल तिथले काम पाहत असत. बुधवारी नेहमीप्रमाणे दोघे जण प्रेसमध्ये गेले होते. तर स्वप्निलची बहिण बाहेर गेली होती. दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर, स्वप्निल कुठेच दिसत नसल्याचे पाहून त्याच्या बहिणीने त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. स्वप्निलने तेथे गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ आई वडिलांना दिली. त्यानंतर जवळील रूग्णालयात स्वप्निला उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले. अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतर स्वप्निलने स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलं होतं मोठं यश

स्वप्नील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करत होता. तो २०१९ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या पूर्व व मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला होता. मात्र करोनाकाळातील निर्बंधामुळे त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही पू्र्व परीक्षा दिली. त्यामध्येही तो उत्तीर्ण झाला. विविध जिल्ह्यातील निर्बंधामुळे मुख्य परीक्षा झालेली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात स्वप्निलने म्हटले आहे.
स्वप्निलच्या आत्महत्येला नेमकं जबाबदार कोण?

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Jayant Patil on Ajit pawar letter
‘सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही’, अजित पवारांचं म्हणणं खरं; जयंत पाटील पुढे म्हणाले…
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

स्वप्निल लोणकर हा तरुण २०१९ मध्ये एमपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र मागील दीड वर्षात मुलाखती झाल्या नव्हत्या. त्याही पुढे जाऊन स्वप्निलने २०२० मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेत यश मिळवले होते. दोन्ही वेळेस उत्तीर्ण होऊन देखील, नोकरी मिळत नसल्याने अखेर स्वप्निलने आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यानंतर, अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या स्वप्निलच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.