पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदल २०२४-२५ पासून लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांनी कल असल्याचे ऑनलाइन सर्वेक्षणातून दिसून आले. नवी पद्धत २०२५पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. 

एमपीएससीने जवळपास दहा वर्षांनी राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आतापर्यंत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरुपाच्या प्रश्नपत्रिका आता वर्णनात्मक स्वरुपाच्या होणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवरच आता राज्यसेवेची परीक्षा योजना वर्णनात्मक पद्धतीची करण्यात आली आहे. २०२३पासून या बदलाची अंमलबजावणी होणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नवा अभ्यासक्रम आणि नवी परीक्षा योजना याबाबतचा कल जाणून घेण्यासाठी एमपीएससी स्टुडंट राइटतर्फे समाजमाध्यमाद्वारे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास १० हजारांहून अधिक उमेदवारांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन प्रतिसाद नोंदवला. प्रतिसाद नोंदवलेल्या उमेदवारांपैकी ७६ टक्के उमेदवारांचा कल २०२४-२५पासून नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना लागू करण्याकडे असल्याचे दिसून आले. तर २४ टक्के उमेदवारांनी २०२३पासूनच या बदलांची अंमलबजावणी व्हावे असे मत नोंदवले. 

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने

गेली काही वर्षे सातत्याने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरुपानुसार उमेदवार तयारी करत आहेत. वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसाठी सखोल तयारी आवश्यक आहे. त्यामुळे नवी परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम २०२४-२५ पासून लागू केल्यास या बदलांना जुळवून घेण्यासाठी उमेदवारांना वेळ मिळेल. तसेच काही उमेदवार यूपीएससीची तयारी करतानाही राज्यसेवा परीक्षाही देत असतात. नवी पद्धत यूपीएससीच्या पद्धतीनुसार असल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना फायदा होऊन केवळ राज्यसेवेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना फटका बसेल, असे उमेदवारांचे म्हणणे असल्याचे एमपीएससी स्टुडंट राइटचे किरण निंभोरे यांनी नमूद केले.