पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णायामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र आयोगाने कोणतेही एकतर्फी निर्णय घेऊ नयेत. विद्यार्थ्यांबरोबर व्यापक चर्चा करूनच योग्य तो निर्णय घ्यावा अशी सूचना आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शुक्रवारी दिली.

दरम्यान या प्रश्न राजकीय नाही. एमपीएसीच्या परीक्षांमध्ये मोठे बदल केले जाणार आहेत. ही स्पर्धा पारदर्शी आणि नियोजित वेळेत व्हावी यासाठी राज्य शासनाचे प्रयत्‍न आहेत. त्यामुळे या निर्णयावरून खासगी शिकवणी चालकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये असा इशाराही त्यांनी दिला.

सारथीच्या वतीने युपीएसससी आणि एमपीएसी मधील यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालक सत्कार समारंभात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार‚ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील‚ महापौर मंजुशा नागपूरे यांच्यासग विविध प्रशासकीय अधिकारी‚ सारथीचे अधिकारी आणि आमदार उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी विविध स्पर्धा परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये अय्वस्थता आहे. यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्षांबरोबर बोलणे झाले आहे. पुढील वर्षापासून नीट ची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. एकतर्फी निर्णय संभ्रम निर्माण करतात तर चर्चेतून झालेले निर्णय विश्वासाचे आणि योग्य ठरतात. त्यामुळे एकतर्फी निर्णय घेऊ नये असे अध्यक्षांना सांगितले आहे. ते चर्चा करूनच निर्णय घेतील असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान एमपीएससी परीक्षा पारदर्शी आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने काही निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले मराठा समाजातील, तसेच विस्थापित आणि आर्थिक मागास वर्गातील युवक आणि युवतींना पुढे आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने बार्टीच्या धर्तीवर सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. अलीएकडे एक समाज दुस-या समाजाबरोबर स्पर्धा करत असल्याचे चित्र दाखविले जात आहे.. मात्र आपण सर्व शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. छत्रपतींनी मावळ्यांना जातीत अडकविले नाही. याच शिकवणीनुसार प्रत्येक समाजासाठी सर्व काही केले जाईल. कोणत्या समाजाचे काही काढून दुस-या समाजाला दिले जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.