scorecardresearch

Premium

पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा लांबणीवरच; २ ऐवजी आता १० डिसेंबरला परीक्षा

प्रशासकीय कारणास्तव अचानकपणे या नियोजनात बदल करावा लागल्याचे एमपीएससीच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट झाले आहे.

MPSC Police Sub-Inspector Limited Divisional Pre-Competition Exam postponed pune
पोलिस उपनिरीक्षक पदासाठीची पूर्व परीक्षा लांबणीवरच; २ ऐवजी आता १० डिसेंबरला परीक्षा (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा २ डिसेंबरला घेण्यात येणार होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता ही परीक्षा १० डिसेंबरला होणार आहे.

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीतर्फे पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा राज्यातील पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाच्या पदांच्या भरतीसाठी घेण्यात येते. एमपीएससीने ही परीक्षा २ डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले होते. या परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावरील प्रवेश, परीक्षेदरम्यानची घ्यावयाची काळजी या संदर्भातील उमेदवारांसाठीच्या सूचनाही एमपीएससीने मंगळवारीच प्रसिद्ध केल्या होत्या.

indrani mukerjea netflix series marathi news, indrani mukerjea netflix marathi news, indrani mukerjea cbi high court marathi news
इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाच्या प्रदर्शनाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात, उर्वरित साक्षीदारांची माहिती देण्याचे नेटफ्लिक्सला आदेश
Teacher Recruitment
शिक्षक भरती : दलाल, मध्यस्थ सक्रिय; ‘ही’ घ्या काळजी…
lokmanas
लोकमानस: खासगी क्षेत्रात तरी संधी निर्माण करा
Chandrakant Patil is of the opinion that all the problems of the principal will be resolved but the implementation of the new educational policy is essential
प्राचार्यांचे सर्व प्रश्न सोडवू पण नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अत्यावश्यक; चंद्रकांत पाटील

हेही वाचा… रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ९३ महाविद्यालयांमध्ये साखळी रक्तदान शिबिरे

मात्र प्रशासकीय कारणास्तव अचानकपणे या नियोजनात बदल करावा लागल्याचे एमपीएससीच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट झाले आहे. आता ही परीक्षा १० डिसेंबरला होणार असल्याचेही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc police sub inspector limited divisional pre competition exam has been postponed pune print news ccp 14 dvr

First published on: 29-11-2023 at 19:11 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×