पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मदतकेंद्रावरील कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करणारे उमेदवार एमपीएससीच्या कचाट्यात सापडले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन एमपीएससीकडून संबंधित उमेदवारांवर कारवाई प्रस्तावित केली आहे. उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी एमपीएससीकडून मदतकेंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी या मदतकेंद्रावर संपर्क साधल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून उमेदवारांची समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले जाते. मात्र काही उमेदवारांकडून मदतकेंद्रावरील कर्मचाऱ्यांबरोबर गैरवर्तन करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर मदतकेंद्रावरील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई प्रस्तावित केल्याचे एमपीएससीने ट्विटरद्वारे स्पष्ट केले.