पिंपरी: थकबाकी न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार चाकण येथील एका बीअर शॉपीत घडला. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळूराम आनंदा जाधव (रा. चाकण, खेड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयूर चंद्रकांत चौधरी (वय-२२, रा. चाकण) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणला हीरो होंडा दालनाच्या शेजारी ‘स्वीकार बीअर शॉपी’ आहे. जाधव यांच्याकडे डिसेंबरपासूनची विजेची थकबाकी आहे. २९ जूनला दुपारी हे पथक थकबाकी वसुलीसाठी गेले होते. तेव्हा त्यांच्या अंगावर धावून जात दांडक्याने मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, पथकातील सदस्यांना शिवीगाळही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl staff pushed and abused during disconnection of electricity supply zws
First published on: 30-06-2022 at 16:20 IST