पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुण्यातील कर्वेनगर भागात रचल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली. त्याचा भाऊ शुभम पसार झाला असून, त्याच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> मावळमध्ये महायुतीत फूट, भाजपच्या बाळा भेगडेंसह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; अपक्ष बापू भेगडेंना पाठिंबा

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ, रियान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग यांना अटक करण्यात आली. प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाज माध्यमांतून बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात होते. सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातही प्रवीण आणि शुभम होते.

हेही वाचा >>> मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटात बापू भेगडे यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार

बिष्णोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभमला अकोला पोलिसांनी अटक केली होती. कर्वेनगर भागातून बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले चौघे जण शुमभच्या संपर्कात होते. बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, तसेच शंकरशेठ रस्त्यावरील एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकाविण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Story img Loader