मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात : मुंबईचे चौघे ठार

दिवसभरात दोन अपघात

पिंपरी- पुणे द्रुतगती मार्गावर रविवारचा दिवस हा अपघातवार ठरला आहे. दोन अपघातांमुळे द्रुतगती मार्गावरील दिवसभर मंदगतीने सुरु होती. दुपारी कामशेत बोगद्याजवळ झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी आहेत. रस्त्यावर ऑईल सांडल्याने कार घसरुन हा विचित्र अपघात झाला होता.

दुपारी तीनच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार रस्त्यात ऑईल सांडल्याने व्हॉल्वो बसखाली गेली आणि हा अपघात झाला. या अपघातात श्रद्धा पाटील (वय १९), भगिनी देशमुख (वय ६०), दत्तात्रय देशमुख (वय ६३) आणि कारचालक दिपक अशा चार जणांचा मृत्यू झाला असून संजना पाटील, रुपाली देशमुख, राहुल देशमुख, रुपेश देशमुख आणि ओम देशमुख हे ५ जण जखमी झाले आहेत. तर राखी पाटील (वय ४०) यांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्वजण मुंबईतील विरार आणि वसई येथील रहीवासी आहेत.

रविवारी सकाळीही मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळच अपघात झाला होता. सकाळी पावणे आठच्या सुमारास ट्रक आणि क्रेनचा अपघात झाला होता. या अपघातात दोन जण जखमी झाले होते. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे तीन किलोपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळी पावणे आठच्या सुमारास ट्रक आणि क्रेनचा अपघात झाला होता. त्यात २ जण जखमी झाले होते. सकाळी झालेल्या अपघातामुळे या हायवेवर २ किलोमीटरहून अधिक अतंर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रविवारची सुटी असल्याने एक्सप्रेस वेवर मोठी गर्दी होती या प्रवाशांची वाहतुक कोंडीने गैरसोय झाली. काही वेळानंतर ही वाहतूक सुरळीत कऱण्यात आली असतानाच हा दुसरा अपघात घडला. त्यामुळे रविवारी एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai pune express way accident near kamshet tunnel

ताज्या बातम्या