scorecardresearch

मुंबई-पुण्याची आघाडी! देशातील घरांच्या विक्रीत निम्म्याहून अधिक वाटा

देशातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३६ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये एक लाख २० हजार घरांची विक्री झाली.

sale of houses mumbai
मुंबई-पुण्याची आघाडी! देशातील घरांच्या विक्रीत निम्म्याहून अधिक वाटा (image – pixabay/representational image)

पुणे : देशातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३६ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांमध्ये एक लाख २० हजार घरांची विक्री झाली. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक घरांची विक्री मुंबई आणि पुण्यात झाली आहे.

देशातील प्रमुख महानगरांतील घरांच्या विक्रीचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकता या सात महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा जुलै ते सप्टेंबर या तिसऱ्या तिमाहीत एकूण एक लाख २० हजार २८० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षातील याच तिमाहीत घरांची विक्री ८८ हजार २३० होती. आता त्यात ३६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. देशात मुंबईमध्ये सर्वाधिक ३८ हजार ५०० घरांची विक्री झाली आहे. त्या खालोखाल पुण्यात २२ हजार ८८० घरांची विक्री झाली. देशातील एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. घरांच्या विक्रीत मुंबईत वार्षिक ४६ टक्के, तर पुण्यात वार्षिक ६३ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

Bank Holiday in October 2023
Bank Holiday October 2023 : ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती ते दसऱ्यापर्यंत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी
jio air fiber
‘जिओ एअर फायबर’द्वारे २० कोटी घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य – मुकेश अंबानी
search operation terrist continue in kashmir
अनंतनागमधील मोहीम सुरूच; दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर
Wholesale inflation rate
घाऊक महागाई दर ऑगस्टमध्ये उणे ०.५२ टक्के, सलग ५ महिने घाऊक महागाई शून्याच्या खाली

हेही वाचा – पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, मोटारीच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

देशात तिसऱ्या तिमाहीत एकूण एक लाख १६ हजार २२० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. नवीन घरांच्या पुरवठ्यात मुंबई आघाडीवर आहे. तिसऱ्या तिमाहीत मुंबईमध्ये ३६ हजार २५० नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात केवळ एक टक्का वाढ झाली. याच वेळी हैदराबादमध्ये २४ हजार ९०० नवीन घरांचा पुरवठा झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात तब्बल ६० टक्के वाढ नोंदविण्यात आली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : मंडप, विसर्जन रथ रस्त्यांवरच; मंडळांवर कारवाई सुरू

अहवालातील ठळक मुद्दे

  • घरांच्या किमतीत सरासरी ११ टक्क्यांची वाढ
  • सरासरी प्रतिचौरस फूट दर ६१०५ रुपयांवरून ६८०० रुपयांवर
  • ४० ते ८० लाख रुपयांच्या घरांचा सर्वाधिक २८ टक्के पुरवठा
  • ८० लाख ते दीड कोटी रुपयांच्या घरांचा २७ टक्के पुरवठा

दीड कोटी रुपयांवरील घरांचा २७ टक्के पुरवठा

देशातील घरांची विक्री (जुलै ते सप्टेंबर २०२३)

  • मुंबई : ३८,५००
  • पुणे : २२,८८५
  • बंगळुरू : १६,३९५
  • हैदराबाद : १६,३७५
  • दिल्ली : १५,८६५
  • कोलकता : ५,३२०
  • चेन्नई : ४,९४०
  • एकूण : १,२०,२८०

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai pune leads in the sale of houses in the country pune print news stj 05 ssb

First published on: 03-10-2023 at 13:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×