पुणे : रेल्वेमार्गावर दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेकडून आतापर्यंत १६ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

मुंबई विभागाच्या अप मेन लाईनवर ठाकुरवाडी आणि ‘मंकी हिल लूप कॅबिन’ दरम्यान आणि पुणे-लोणावळा घाट विभागात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुण्यासह दक्षिण भारत गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

१) गाडी (२२१०५) सीएसएमटी – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस

२) गाडी (१२१६९) पुणे स्टेशन – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस

३) गाडी (१२१७०) सोलापूर – पुणे जं. इंटरसिटी एक्सप्रेस

४) गाडी (२२१०६) पुणे – सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस

५) गाडी (१२१२७) सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

६) गाडी (१२१२८) पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस

७) गाडी (११००७) सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्सप्रेस

८) गाडी (११००८) पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस

९) गाडी (१२१२४) पुणे – सीएसएमटी डेक्कन क्वीन

१०) गाडी (१२१२३) सीएसएमटी – पुणे डेक्कन क्वीन

११) गाडी (१२१२६) पुणे – सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस

१२) गाडी (१२१२५) सीएसएमटी – पुणे प्रगती एक्सप्रेस

१३) गाडी (११०१०) पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस

१४) गाडी (११००९) सीएसएमटी – पुणे सिंहगड एक्सप्रेस

१५) गाडी (११०११) सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस

१६ ) गाडी (११०१२) धुळे – सीएसएमटी एक्सप्रेस

दुसऱ्या मार्गांवरून वळविण्यात आलेल्या गाड्या

अहमदाबाद – कोल्हापूर एक्सप्रेस : कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे

इंदूर – दौंड एक्सप्रेस : कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे

अहमदाबाद – पुणे दुरांतो एक्सप्रेस : कल्याण – इगतपुरी – मनमाड – दौंड कॉर्ड लाईन – पुणे मार्गे

बिदर – सीएसएमटी एक्सप्रेस : दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे

हजूर साहिब नांदेड – पनवेल एक्सप्रेस : दौंड – मनमाड – इगतपुरी – कल्याण मार्गे

चार्लापल्ली – इंदूर हमसफर एक्सप्रेस : दौंड – मनमाड – जळगाव – पाळधी – सुरत मार्गे

एलटी – एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस : कर्जत – पनवेल – कल्याण – कसारा – इगतपुरी – मनमाड – दौंड मार्गे

दौंड – ग्वालियर सुपरफास्ट एक्सप्रेस : लोणावळा – पुणे – दौंड कॉर्ड लाईन – अंकाई – भुसावळ – खांडवा मार्गे

चेन्नई एग्मोर – सीएसएमटी : दौंड कॉर्ड लाईन – अंकाई – मनमाड – इगतपुरी – कसारा – कल्याण – सीएसएमटी मार्गे

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

संत्रागाछी – पुणे हमसफर एक्सप्रेस पनवेल स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

सोलापूर – सीएसएमटी सिद्धेश्वर गाडी पुणे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

हैदराबाद – सीएसएमटी हुसेनसागर एक्सप्रेस लोणावळा स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

विशाखापट्टणम – एलटी एक्सप्रेस लोणावळा स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

होसपेट – सीएसएमटी एक्सप्रेस तळेगाव स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस पुणे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

हुबळी – दादर एक्सप्रेस पुणे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

कोल्हापूर – सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

हजरत निजामुद्दीन – पुणे स्पेशल कर्जत स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

दादर – सातारा एक्सप्रेस कर्जत स्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

दुसऱ्या स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या गाड्या

पुणे – संत्रागाछी हमसफर एक्सप्रेस पनवेल स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

सीएसएमटी-के.एस.आर बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस पुणे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

मुंबई सीएसएमटी – हैदराबाद एक्सप्रेस लोणावळा स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

एलटी-विशाखापट्टणम एक्सप्रेस लोणावळा स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस पुणे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

दादर – सातारा एक्सप्रेस पुणे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

दादर – हुबळी गाडी पुणे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

सीएसएमटी – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

दादर – पुडुचेरी एक्सप्रेस पुणे स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

वेळ बदलेल्या गाड्या

दौंड – इंदूर : ६ तास उशिरा रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल

एलटीटी – विशाखा : ३ तास उशिरा ९ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल

सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस : ३ तास उशीरा ११ वाजून ४० मिनिटांनी सुटेल

नांदेड – सीएसएमटी : २ तास उशिरा. दुपारी ३ वाजून मिनिटांनी सुटेल

दरम्यान, प्रवास करण्यापूर्वी १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा आयआरटीसीच्या अधिकृत संकेतस्थळ, अॅपवर अद्यावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.