पुणे : लोणावळा-कर्जत विभागातील ठाकुरवाडी कॅबिन आणि मंकी हिल कॅबिन दरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे मंगळवारी (७ जुलै) सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे. परिणामी, पुणे-मुंबईसह दक्षिण भारत, गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द, अन्य मार्गाने वळविण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळ पुनर्नियोजित करण्यात आल्या आहेत.

या दुर्घटनेमुळे १४ गाड्या रद्द करण्यात आल्या, तर सीएसएमटी-कोल्हापूर एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. याशिवाय आज (७ जुलै) १ वाजून १५ मिनिटांनी धावणारी सीएसएमटी- नांदेड एक्सप्रेस (२०७०६) दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सोडण्यात येणार आहे. तसेच चेन्नई, यशवंतपूर, कोईमतूर, नांदेड, वेलंकिनीच्या या लांब पल्ल्याच्या गाड्या दौंड-मनमाड मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

  • मार्ग बदललेल्या गाड्या – ५
  • अर्धवट थांबवलेल्या गाड्या – ३
  • अर्धवट सुरू झालेल्या गाड्या – ३
  • वेळ बदललेल्या गाड्या – १

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

१. (११०९२) पुणे-भुज एक्सप्रेस

२. (१२१६९) पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस

३. (१२१७०) सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

४. (२२१०६) पुणे – सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस

५. (१२१२८) पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस

६. (११००८) पुणे – सीएसएमटी दख्खन एक्सप्रेस

७. (१२१२३) सीएसएमटी – पुणे दख्खन क्वीन एक्सप्रेस

८. (१२१२६) पुणे – सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस

९. (१२१२५) सीएसएमटी – पुणे प्रगती एक्सप्रेस

१०. (११००९) सीएसएमटी – पुणे सिंहगड एक्सप्रेस

११. (११०११) सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस

१२. (११०१२) धुळे – सीएसएमटी एक्सप्रेस

१३. (११०२८) सातारा – दादर एक्सप्रेस

१४. (११०९१) भुज – पुणे एक्सप्रेस

या गाड्यांचे मार्ग बदलले

१. (२२१६०) चेन्नई – सीएसएमटी एक्सप्रेस : दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण मार्गे वळवली

२. (०९०२९) वेलंकिनी – दहानू रोड स्पेशल : दौंड-मनमाड-जळगाव-पालधी-सुरत मार्गे वळवली

३. (१७६१४) नांदेड – पनवेल एक्सप्रेस : दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण – पनवेल मार्गे वळवली

४. (१४८०५) यशवंतपूर – बाडमेर एक्सप्रेस : दौंड-मनमाड-जळगाव-पालधी-सुरत मार्गे वळवली

५. (११०१४) कोईमतूर – एलटी एक्सप्रेस : दौंड-मनमाड-इगतपुरी-कल्याण मार्गे वळवली

दुसऱ्या स्थानकांवर थांबविण्यात आलेल्या गाड्या

१. (१७३१७) हुबळी – दादर एक्सप्रेस : पुणे स्थानकावर थांबवली

२. (२२७३१) हैदराबाद – सीएसएमटी एक्सप्रेस : पुणे येथे अर्धवट थांबवली

३. (२२२२६) सोलापूर – सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस : पुणे येथे अर्धवट थांबवली

दुसऱ्या स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या गाड्या

१. (१७३१८) दादर – हुबळी एक्सप्रेस : पुणे येथून सुरू होईल

२. (१२७०१) सीएसएमटी – सिकंदराबाद एक्सप्रेस : पुणे येथून सुरू होईल

३. (२२२२५) सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस : पुणे येथून सुरू होईल