scorecardresearch

पिंपरीः बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई ; महापालिका आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन शिस्त पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

पिंपरीः बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई ; महापालिका आयुक्तांचे आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिका (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन शिस्त पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नाही. अशा वर्तवणुकीमुळे पालिकेचे कार्यालयीन कामकाज विल्कळीत होत आहे, या पार्श्वभूमीवर आयुक्ताने हे आदेश दिले आहेत. याबाबत परिपत्रक आयुक्तांनी काढले आहे.

हेही वाचा >>>पुणे: सत्तार यांची खंडणीखोरी कोणाच्या आशीर्वादाने? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सवाल

नियमित उपस्थिती पडताळून पाहण्यासाठी हजेरी पत्रकाची दैनंदिन तपासणी करावी. पालिकेचा गणवेश तसेच ओळखपत्रे परिधान न करणाऱ्यांवर कारवाई करावी. कार्यालयीन नोंदवही अद्ययावत न ठेवल्यास तसेच कामात टाळाटाळ केल्यास कारवाई करावी. सर्व टपाल तातडीने निकाली काढावे. ओळखपत्र तसेच प्रवेशिका असल्याशिवाय पालिकेत प्रवेश देऊ नये. कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने वागावे. सेवानिवृत्ती प्रकरणांमध्ये संबंधित विभागाने ८ महिने आधी प्रशासकीय कार्यवाही सुरू करावी, आदी विविध सूचना आयुक्तांनी या परिपत्रकात केल्या आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 17:43 IST

संबंधित बातम्या