scorecardresearch

संतापजनक : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून खून; एका आरोपीला अटक

लैंगिक अत्याचार करून त्या मुलाचा खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली.

kothrud police station

पुण्यातील कोथरूड येथील विशेष अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कोथरूड पोलिसानी अटक केली आहे. पिटु गौतम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील एकलव्य कॉलेजच्या मैदानावर गुरुवारी रात्री काही मुले खेळत होती. तेथील एका पोत्यात अंगावर कपडे नसलेल्या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती नागरिकांनी कोथरूड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्याच दरम्यान मुलगा हरवला आहे,अशी तक्रार पालक आमच्याकडे घेऊन आले होते. तेव्हा त्यांना मृतदेहाचे फोटो दाखविले. त्या पालकांनी तो आपलाच मुलगा असल्याचे सांगितले. त्यानंतर खून झालेल्या मुलाच्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली.

दरम्यान खून झालेल्या मुलाच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या पिटु गौतम याने खून केल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले असता, लैंगिक अत्याचार करून त्या मुलाचा खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानंतर तो मृतदेह पोत्यात टाकून मैदानावर फेकून दिला असे आरोपीने सांगितले. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder after sexual abuse of a minor in pune abn 97 svk

ताज्या बातम्या