scorecardresearch

Premium

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; हडपसर भागातील घटना; एकास अटक

दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली.

murder
संग्रहित छायाचित्र

पुणे : दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण नामदेव नाईक (वय ४१, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आला आहे. याबाबत अनिलचा भाऊ अक्षय राजू सासी (वय २५) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल चर्मकार आहे. आरोपी प्रवीण मजुरी करतो. दोघे चांगले मित्र असून दोघांना दारु पिण्याचे व्यसन आहे.

आठवड्यापूर्वी हडपसर भागातील वैदुवाडीतील कालव्याजवळ दोघेजण दारू पित होते. त्या वेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद ‌झाला. रागाच्या भरात प्रवीणने अनिलच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा रविवारी (७ ऑगस्ट) रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. पसार झालेल्या प्रवीणला पोलिसांनी अटक केली. सहायक निरीक्षक संतोष डांगे तपास करत आहेत.

tanker driver, car accident, vasai
वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू
woman
जंगलात फिरायला गेलेल्या जोडप्याचा पोलिसांकडून लैंगिक छळ, तीन तास डांबून ठेवलं अन्…
young woman was raped by man
पुणे: पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार
man killed by hitting paver block
मुंबई: पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून एकाची हत्या

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Murder friend argument drinking incident hadapsar area arrest crime pune print news ysh

First published on: 08-08-2022 at 16:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×