हडपसर भागातील घटना; दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून केशकर्तनालय चालकाचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील भेकराईनगर येथे बुधवारी घडली. पोलिसांनी खून करुन पसार झालेल्या एकाला तातडीने तपास करुन अटक केली. याप्रकरणी एका तरुणासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश कमलेशप्रसाद शर्मा (वय २८, रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. अलहाबाद, उत्तरप्रदेश)असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगेश किशोर शिंगाडे (वय २०) याला अटक करण्यात आली. त्याचा साथीदार शुभम रमेश कवडे (वय १९) याच्यासह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ते पसार झाले आहेत.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’

घटनाक्रम

शर्मा याचे भेकराईनगर येथे केशकर्तनालय आहे. काही दिवसांपूर्वी त्याची आरोपी मंगेश याच्यासोबत भांडणे झाली होती. त्यामुळे मंगेश साथीदारांना घेऊन बुधवारी शर्माच्या घरी गेला. त्या वेळी तो घरी नव्हता. या घटनेची माहिती शर्माला त्याच्या पत्नीने दिली होती. बुधवारी सकाळी मंगेश, त्याचा साथीदार कवडे अल्पवयीन साथीदारांसोबत शर्मा याच्या केशकर्तनालयाजवळ थांबले होते. शर्मा दुकानात गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आरोपी शिरले. माझ्या घरी का गेला होता,अशी विचारणा शर्माने आरोपींकडे केली. त्यांच्यात तेथे वादावादी झाली. आरोपींनी शर्मावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झालेल्या शर्माला तातडीने नागरिकांनी खासगी रुग्णालयात नेले.मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावला होता. दरम्यान, पसार झालेल्या शिंगाडेला पोलिसांनी तासाभरात अटक केल्याची माहिती हडपसर पोलीसांनी दिली आहे.