scorecardresearch

चाकणला सराईत गुन्हेगाराचा खून; १३ जणांवर गुन्हा

चाकणला सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकणला सराईत गुन्हेगाराचा खून; १३ जणांवर गुन्हा
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

पिंपरीः चाकणला सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनेश संजय घोगरे उर्फ मोन्या (वय-२१, रा. चाकण) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी शुभम म्हस्के, चेतन म्हस्के, चंद्रकांत कुऱ्हाडे, रोहित कुऱ्हाडे, अर्जून कुऱ्हाडे, आकाश चौधरी, किशोर धिवर, प्रणव जाधव आदींसह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> चिंचवड उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनेशला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारीची मुदत संपली होती. सोमवारी रात्री अमोल लाटूकर या मित्रासमवेत तो घरी जात होता. चाकण मार्केटजवळ दुचाकींवर आलेल्या १३ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात घोगरेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या