Murder of a young man near Bhide bridge pune print news | Loksatta

पुणे : भिडे पूलाजवळ तरुणाचा खून; पोलिसांकडून तपास सुरु

तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

पुणे : भिडे पूलाजवळ तरुणाचा खून; पोलिसांकडून तपास सुरु
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

भिडे पुलाजवळ तरुणावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. खुनामागचे कारण समजू शकले नाही. गणेश सुरेश कदम (रा. अमृतेश्वर मंदिराजवळ, शनिवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

हेही वाचा- पुण्यातील भवानी पेठेत पोलिसांनी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले

उपचारापूर्वीच मृत्यू

. बाबा भिडे पुलाजवळ मोकळ्या जागेत सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कदम गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या गळ्यावर शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कदम याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा- एटीएम केंद्रातील रोकड चोरीचा प्रयत्न; तीन अल्पवयीन मुले ताब्यात

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय

कदम शनिवार पेठेत राहायला असल्याने परिसरातील नागिरकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. कदम याच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या हल्लेखाेरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. कदमचा भाऊ ओम याचा काही वर्षांपूर्वी शनिवार पेठेत खून झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील विजयावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब ; मनसेचे ॲड. किशोर शिंदे यांची याचिका फेटाळली

संबंधित बातम्या

पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेनेच्या पहिल्या जाहीर मेळाव्याकडे कार्यकर्त्यांची पाठ
रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व
अकृषक प्रस्ताव मंजुरीसाठी ४२ लाख रुपयांच्या लाचेची मागणी; तीन तहसीलदार, दोन दलालांविरुद्ध गुन्हा
पुणे: पुण्याला शेती क्षेत्राचे पाणी द्या; महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी
‘सहारा’चा पुण्यातील भूखंड लवकरच म्हाडाकडे ; ५२ एकरची जमीन ३७६ कोटींना खरेदी करण्याचा निर्णय

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बोम्मईंच्या राजकीय लाभासाठी भाजपचे कर-नाटक?
“ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं कोकण महोत्सवात वक्तव्य
“मी आज अरबाजमुळेच…” पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मलायका अरोराने केलेलं वक्तव्य चर्चेत
“आपल्या समाजात…”, चित्रपटांमुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांवर नीना गुप्तांनी मांडलं मत
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळी भीमशक्ती माझ्याबरोबर असल्याने…”