“मुलांना नीट जेवण देत नाही, सांभाळत नाही”, पुण्यात पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

पुण्यात पतीने पत्नीला तू मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस असा आरोप करत जबर मारहाण केली.

पुण्यात पतीने पत्नीला तू मुलांचा सांभाळ नीट करीत नाहीस, वेळेवर खाऊ घालत नाहीस असा आरोप करत जबर मारहाण केली. यात पीडित पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. तौसिफ हवारी शेख असे या आरोपी पतीचे नाव आहे, तर पीडित महिलेचं नाव आसमा हवारी शेख (वय ३५, रा. कशेवाडी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती तौसिफ आणि त्याची पत्नी आसमा हे कशेवाडीत राहत होते. त्यांना तीन मुलं होती. त्या दोघांमध्ये सतत वाद होत होते. सोमवारी (६ डिसेंबर) रात्री साडेअकरा वाजता पती तौसिफ याने पत्नी आसमावर तू मुलांना नीट सांभाळत नाही. त्यांना जेवण नीट देत नाहीस, असे आरोप केले. तसेच त्यांच्याकडे लक्ष दे सांगत बेदम मारहाण केली.

हेही वाचा : कल्याण : अनेकदा समज देऊनही शेजारी राहणारा रिक्षावाला वहिनीच्या बेडरुममध्ये डोकवायचा; दिराने केला खून

यानंतर घरात सर्वजण झोपी गेले. सकाळी सर्वजण उठले, पण पत्नी आसमा उठत नव्हती. त्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती खडक पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Murder of wife alleging not caring to children by husband in pune pbs

Next Story
वर्षांनुवर्षे पाणी गळती
फोटो गॅलरी