scorecardresearch

पुणे: मालमत्तेच्या व्यवहारातील दलालीच्या वादातून कोंढव्यात एकावर खुनी हल्ला

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे

crime in yavatamal
कारमधून आले अन् चाकूचा धाक दाखवून २५ टन साखरेचा ट्रकच घेऊन गेले(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मालमत्तेच्या व्यवहारातील दलालीच्या वादातून कोंढव्यामध्ये एकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. लॅन्सी मार्टिन दास ( वय ५२, रा. गणेश आंगन, दापोडी ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संदीप विट्ठल खोपडे (रा. कात्रज) याच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

आणखी वाचा- पुणे: रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर झाला गर्भवती मुलीचा बालविवाह उघड

दास यांनी या संदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंबईतील बंगल्याची विक्रीचा व्यवहार दास यांनी केला होता. त्यामध्ये दलाली देण्याच्या कारणावरून संशयित आरोपी खोपडेची दास यांच्याशी भांडणे झाली होती. आरोपीने कोंढव्यातील टिळेकरनगर भागातील निर्जन ठिकाणी दास यांना नेऊन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या खोपडेचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 12:42 IST

संबंधित बातम्या