scorecardresearch

पुणे : दुरूस्तीसाठी नेलेल्या बारा लाखांच्या मोटारीची परस्पर विक्री

दुरुस्तीसाठी नेलेल्या मोटारीची परस्पर विक्री करणाऱ्या एकाच्या विरोधात येरवडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

पुणे : दुरूस्तीसाठी नेलेल्या बारा लाखांच्या मोटारीची परस्पर विक्री
( संग्रहित छायचित्र )

दुरुस्तीसाठी नेलेल्या मोटारीची परस्पर विक्री करणाऱ्या एकाच्या विरोधात येरवडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी उत्कर्ष साळवे (रा. फुलेनगर, आरटीओजवळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुष्पा सतीश जैन (रा. फुलेनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुणे : झोपेत असलेल्या पत्नीचा पेटवून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

जैन आणि साळवे ओळखीचे आहेत. साळवे हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंट म्हणून काम करतो. तो वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. जैन यांनी विश्वासाने साळवेला विश्वासाने मोटार दुरुस्तीसाठी दिली होती. साळवेने जैन यांच्या मोटारीची परस्पर विक्री केली. जैन यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी साळवेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या