तब्बल बाराशे कादंबऱ्या लिहिणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचं आज वयाच्या ८४ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले गुरुनाथ नाईक हे मूळचे गोवा येथील गोमंतकातील सत्तरीजवळचे. आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आहे. तर राणे हे त्यांचं मूळ आडनाव होतं. गुरुनाथ नाईक यांनी ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ ही त्यांची पहिली रहस्यकथा.

‘गोलंदाज’ ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती १५० कथा लिहिल्या. त्याच दरम्यान गुरुनाथ नाईक यांनी रहस्यकथा लिहिण्यापूर्वी १९५७ ते १९६३ च्या काळामध्ये विविध विषयांवर लिखाण केले. तर पुणे आकाशवाणी केंद्रासाठी काही संगीतिका आणि गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका देखील त्यांनी लिहिल्या आहेत.

त्याच दरम्यान १६ वर्षापूर्वी त्यांना पक्षाघात हा आजार झाला. त्या आजारावर उपचार घेत असतानाच आज पुण्यात वयाच्या ८४ व्या निधन झाले.