पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) उच्च शिक्षण संस्थांच्या मूल्यांकन प्रक्रियेत आमूलाग्र बदल प्रस्तावित केले आहेत. त्यात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित, परिणामाधिष्ठित करण्यासह तंत्रज्ञानाचा वापर करून रिअल टाइम मूल्यांकन, एकाच संस्थेवर अवलंबून न राहता अधिक संस्थांकडून मूल्यांकन प्रक्रिया राबवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले असून, या बदलांसंदर्भातील श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून त्यावर हरकती-सूचना नोंदवण्यासाठी १५ जूनची मुदत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण प्रक्रियेत गुणवत्ता वाढवण्यासाठी देशभरातील उच्च शिक्षण संस्थांचे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून मूल्यांकन केले जाते. त्यात उच्च शिक्षण संस्थांतील सोयीसुविधा, प्राध्यापक-विद्यार्थ्यांची संख्या, संशोधन, माजी विद्यार्थी आदी निकषांचा समावेश असतो. मात्र अद्याप अनेक उच्च शिक्षण संस्था नॅक मूल्यांकन प्रक्रियेपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने नॅक मूल्यांकनाची पुनर्रचना करण्याची गरज व्यक्त करणारी श्वेतपत्रिका नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन आणि प्रा. के. पी. मोहनन यांनी शिक्षणतज्ज्ञांच्या सहकार्याने तयार केली आहे. या श्वेतपत्रिकेचा मसुदा नॅकच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. त्यावर शिक्षण क्षेत्रातील विविध भागधारकांकडून हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naac proposed changes to evaluation of educational institutions process zws
First published on: 06-06-2022 at 01:29 IST