पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. मात्र, राज्यात महाविकासआघाडी म्हणून एकत्र आलेले शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निवडणुकीत मात्र एकत्र येणार नसल्याचेच संकेत मिळत आहेत. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमागे फरफटत जाणार नसल्याचं म्हणत याला दुजोरा दिलाय. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “पक्षांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलंय आहेत. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागे फरफटत जाणार नाही. कोण मजबूत आहे हे ते नेते ठरवत नाहीत तर जनता ठरवेल. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ही शहर काँग्रेस विचारधारेची आहेत. काँग्रेस त्याच ताकदीने जनतेसमोर जाणार आहे. पुणे, पिंपरी महानगर पालिका भ्रष्टचाराने बरबटलेल्या आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाने लाच घेणे हे त्याचे उदाहरण आहे. या दोन्ही महानगर पालिका काँग्रेसच जिंकेल. कोणी प्रस्ताव दिल्यास यावर चर्चा करू.”

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
opposition india alliance
बिहार ते महाराष्ट्र; लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसला करावी लागतेय तारेवरची कसरत

“पंतप्रधानांच्या पदाची गरीमा संपवण्याचं काम भाजपाने केले”

“मी तेव्हा गावगुंडाबद्दल बोललो होतो. तो पुढे आला. देशाच्या पंतप्रधानांच्या पदाची गरीमा संपवण्याचं काम भाजपाने केले आहे. भाजपाकडून रस्त्यावर गुंडागर्दी केली गेली. माझ्या प्रतिमेची जाळपोळ केली, विटंबना केली. ही परंपरा, वृत्ती आजच्या भाजपाची नाही. महात्मा जोतिबा फुले, सावित्री बाई फुले यांना काय त्रास दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काय त्रास दिला या सगळ्यांच्या इतिहासात नोंदी आहेत,” असं नाना पटोल यांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘नन्हे पटोले’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “त्या आमच्या…”

“आज मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, संस्थानिक राजकारणी नाही. मी जनेतीची लढाई लढत आहे. त्यांच्या अधिकाराची लढाई लढतोय,” असंही यावेळी नाना पटोले यांनी नमूद केलं.