पुणे : आधुनिक सुविधा आणि सांस्कृतिक दृष्टी विकसित सामूहिक जीवनशैलीचे सर्वोत्तम उदाहरण असलेल्या मगरपट्टा सिटी ग्रुपच्या नांदेड सिटी, रिव्हर व्ह्यू सिटी आणि अन्य प्रकल्पांमध्ये नुकताच दीपोत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. नागरिकांच्या सहभागाने मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी आणि इतर प्रकल्प लख्ख प्रकाशाने उजळून निघाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे: पोलीस भरतीची प्रतीक्षा कायम, उमेदवारांमध्ये निराशा

मगरपट्टा सिटी, नांदेड सिटी, रिव्हर व्ह्यू सिटी या टाउनशिप आणि इतर प्रकल्पातील एक लाखांहून अधिक नागरिकांनी या दीपोत्सवात सहभाग घेतला. करोनाचा काळ वगळता मागील काही वर्षांपासून मगरपट्टा सिटी ग्रुप या दीपोत्सवाचे सातत्याने आयोजन करीत आहे . या मंगलमयी दीपोत्सवाने आयुष्यात नवीन चैतन्य निर्माण झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या लोणी काळभोर येथील रिव्हर व्ह्यू सिटी मध्ये देखील तिथे घरखरेदी केलेल्या ग्राहकांच्या सहभागाने दीपोत्सव आयोजित करण्यात आला.

हेही वाचा >>> पुणे: ‘प्राण्यांना अन्नाचा आणि नागरिकांना त्यांना खायला देण्याचा अधिकार’ प्राण्यांच्या अधिकारांबाबत जनजागृती

एका सामूहिक, आधुनिक आणि सुरक्षित जीवनशैलीसोबतच विविध सण-समारंभ आणि उपक्रमांच्या निमित्ताने एकत्र आल्याने मगरपट्टा सिटी ग्रुपमधील विविध प्रकल्पांत मिळून एक सुंदर सहनिवासाची संस्कृती तयार होते आहे. ही तिथे वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसह आम्हा सर्वांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

– सतीश मगर, व्यवस्थापकीय संचालक, मगरपट्टा सिटी ग्रुप

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nanded city lit up with thousands of lights modern facilities cultural of lifestyle pune print news ysh
First published on: 31-10-2022 at 10:15 IST