scorecardresearch

‘त्या’ विधानाची फडणवीसांना आठवण करून देणार; नारायण राणे यांचे वक्तव्य

राणे म्हणाले, उद्योगात राजकारण आणू नका, कामगारांना संरक्षण मिळायला पाहिजे. मात्र कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकीय नेता स्वत:चे घर भरत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.

‘त्या’ विधानाची फडणवीसांना आठवण करून देणार; नारायण राणे यांचे वक्तव्य
नारायण राणेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकीय नेता स्वत:चे घर भरत असेल, तर ते खपून घेतले जाणार नाही, या विधानाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आठवण करून दिली जाईल आणि त्या विधानानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले जाईल, असे केंद्रीय सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

हेही वाचा- “देशात जूनपर्यंत आर्थिक मंदी येऊ शकते”; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली चिंता

उद्योगात राजकारण आणू नका, कामगारांना संरक्षण मिळायला पाहिजे, हे नक्की आहे. मात्र कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी राजकीय नेता स्वत:चे घर भरत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्या राजकीय नेत्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. असे देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना सांगितले होते. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे विचारणा केली असता, फडणवीस यांना त्या विधानाची आणि कार्यवाही करण्याची आठवण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राजकारण्यांनी घातलेला वाद चुकीचा’; मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. गो. बं. देगलूरकर यांचे मत

राणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपदही आहे. ते बोलले असतील तर त्यांना त्याची जाणीव असेल. मात्र त्यांच्या विधानाची आठवण त्यांना नक्की करून देईल. कोणी खंडणी वसूल करत असेल तर त्याविरोधात पोलीस कारवाई होईल. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक येण्यासाठी सुरक्षितता दिली जाईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या