पुणे : पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मानसन्मान ठेवला गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमा पालकमंत्री म्हणून सहभागी होणार आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यात सहभागी होण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. मात्र, त्यांची तब्येत पाहून ते निर्णय घेतील. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी देखील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमात सहभागी होतील.’ दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोध दर्शविला आहे.