पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार | National Award for eRegistration System to Registration and Stamp Duty Department pune print news amy 95 | Loksatta

पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला नागरिकांसाठी सुरू केलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या ‘ई-रजिस्ट्रेशन’ प्रणालीसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘ई-गव्हर्नन्स’ पुरस्कार २०२२ (सुवर्णपदक) प्राप्त झाला आहे.

पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला नागरिकांसाठी सुरू केलेल्या आणि यशस्वी ठरलेल्या ‘ई-रजिस्ट्रेशन’ प्रणालीसाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘ई-गव्हर्नन्स’ पुरस्कार २०२२ (सुवर्णपदक) प्राप्त झाला आहे. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी या पुरस्कार स्वीकारला.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागरिकांसाठी अनेक सुविधा ऑनलाइन सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक ‘ई-रजिस्ट्रेशन’ ही प्रणाली आहे.

हेही वाचा >>>पुणे :कोथरुड, दत्तवाडी भागात अमली पदार्थांची विक्री; साडेचार लाखांचे अमली पदार्थजप्त, तिघे अटकेत

या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन भाडेकरार घरबसल्या, तर सदनिकांचा प्रथम विक्री करारनामा (फर्स्ट सेल) बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातूनचनोंदविता येतात. त्यामुळे या कामांसाठी नागरिकांना दस्त नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. ही प्रणाली यशस्वीपणे राबविण्यात येत असून नागरिकांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 17:21 IST
Next Story
पुणे: भोसरीत ‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती फेरीत हजारोंचा सहभाग