scorecardresearch

पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई

सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे या रस्त्यांचा वापर होत नसून मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे

पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुणे-सातारा रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. सेवा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली. महामार्गावरील खेड-शिवापूर ते वेळू या तीन किलोमीटर अंतराच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली असून दीडशे किऑक्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे : गोवरचे रुग्ण शोधण्याचे आदेश; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

महामार्गावर विविध प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून हात घेण्यात आली आहे. सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे या रस्त्यांचा वापर होत नसून मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सेवा रस्ते वाहनचालकांसाठी मोकळे करून देण्यात येत आहेत. त्यासाठी पन्नास अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाई सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 10:06 IST

संबंधित बातम्या