scorecardresearch

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

घरगुती गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी आंदोलन करण्यात आले.


पुणे : घरगुती गॅस सिलिंडरसह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होत असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी आंदोलन करण्यात आले. गॅस सिलिंडरची प्रतीकात्मक
अंत्ययात्रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काढत दरवाढीचा निषेध नोंदविला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पर्वती विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातारा रस्ता येथे निषेध आंदोलन करण्यात आले. महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, शहर प्रवक्ता प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, श्वेता होनराव, शशिकांत तापकीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुका झाल्यानंतर तातडीने दरवाढ करण्यात आली आहे. लोकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्य नागरिकांवर महागाई लादायची असून उद्योगपतींची संपत्ती वाढवायची आहे, असा आरोप या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nationalist congress party agitation against gas price hike amy