पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई या दोघांच्या फोटोवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधला आहे.

त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या घरच्यांविषयी बोलल्याशिवाय बातमी होतच नाही. तुम्हाला माझा उद्धटपणा वाटेल, पण तुम्हाला हात जोडून म्हणते की, तो माझा उद्धटपणा नाही. त्यामुळे मी प्रांजळपणे सांगते. आमच्या घरातील कोणाचा तरी कोणा सोबत फोटो होत असेल आणि त्याची बातमी होत असेल तर हाऊ द्या. चॅनेल पण बिझी राहतील आणि त्यांना पण पब्लिसिटी मिळते. एवढं तरी माणसानं दिलदार असलं पाहिजे, अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

“पार्थ पवार यांचा लोकसभेत अडीच लाखांच्या मतांनी पराभव झाला. राजकीय स्थिरता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतील. घरात आजोबांकडून अन्यात होत असल्याने, न्याय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,” असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. पार्थ पवारांनी शंभूराज देसाई यांचा शासकीय बंगला असलेल्या पावनगड येथे जाऊन भेट घेतली आहे. तेव्हा १५ ते २० मिनिट त्यांच्यात चर्चा झाली. काही खासगी कामासाठी ही भेट असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं.