पुणे : केंद्र सरकार अन्यायकारक पद्धतीने इंधन दरवाढ करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारला आश्वासनाचा विसर पडला असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावेळी महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, काका चव्हाण, प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, संतोष फरांदे, गणेश नलावडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
pankaja munde
“वर्गणी काढून मला घर बांधून द्या, मी मरेपर्यंत…”, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम

महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्दय़ांचे भांडवल करत भारतीय जनता पक्षाने सत्ता प्राप्त केली. सन २०१४ मध्ये तीनशे रुपयांना मिळणारा सिलिंडर एक हजार रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहे. सातत्याने दरवाढ करून सर्वसामान्यांची लूटमार केंद्र सरकार करत आहे. सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकण्याची भाजपी नीती आहे, असा आरोप या वेळी प्रशांत जगताप यांनी केला.