पुणे : ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू - नौदलप्रमुख | Naval Chief R Hari Kumar opinion on landing of fighter jets on INS Vikrant pune print news amy 95 | Loksatta

पुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख

देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

पुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख
आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू( संग्रहित छायचित्र )

देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत या युद्धनौकेवर लढाऊ विमाने तैनात करण्यात येतील, असे नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी बुधवारी सांगितले. नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>पिंपरीः चिंचवड मैलाशुद्ध्रीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३१ कोटी खर्च

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४३ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळ्यानंतर नौदलप्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधला.हरी कुमार म्हणाले, ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यावर त्याच्या समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्यांना सुरुवात झालीू आहे. लढाऊ विमाने उतरविण्याची प्रणाली (लँडिंग सिस्टीम) तपासावी लागणार असून त्या संदर्भातील चाचण्या सुरू आहेत. सर्वसाधारणपणे अशा चाचण्यांसाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. पुढील वर्षातील जूनपर्यंत या चाचण्या पूर्ण होतील.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडला २५ ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’

नौदलाने स्वयंपूर्णतेवर भर दिला असून, त्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नौदलात १९६० मध्ये पहिली स्वदेशी बनावटीची छोटी नौका दाखल झाली. तेव्हापासून आम्ही मोठमोठ्या नौका, विनाशिका, विमानवाहू युद्धनौकांची देशांतर्गत बांधणी करत आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
‘एनडीए’मध्ये महिला छात्रांना प्रवेश देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. ‘सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. नौदलाने महिला खलाशांना सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत खलाशांची तीन हजार रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी दहा लाख अर्ज आले आहेत. त्यापैकी ८२ हजार अर्ज महिलांचे आहेत.- आर. हरी कुमार, नौदलप्रमुख

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 20:49 IST
Next Story
पिंपरीः चिंचवड मैलाशुद्ध्रीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३१ कोटी खर्च