महाराष्ट्रातील जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीचा महानवमी होम मंगळवारी संपन्न झाला. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास हवन करण्यात आले. मध्यरात्रीनंतर देवीची नववी माळ लावून घट उठविण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंत्रोच्चारण करत होम प्रज्वलित करण्यात आला. होमात पुर्णाहुती दिल्यानंतर भाविकांची दर्शनरांग सुरू करण्यात आली. दरम्यान सोमवारी मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. देवीचे आणि होमाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविक गडावर येऊन थांबले होते. होम प्रज्वलित होताच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. गडावर देवीच्या दर्शनाची एक रांग व होमाच्या दर्शनाची दुसरी रांग अशा दोन रांगा लावण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा >>> स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा ; १७ जणांविरुद्ध गुन्हे शाखेची कारवाई

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
jejuri marathi news, two lakh pilgrims jejuri marathi news
जेजुरीच्या सोमवती यात्रेस दोन लाख भाविक, शालेय परीक्षा व पाडवा सणाचा यात्रेवर परिणाम
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे

महानवमी आणि दशमी या वर्षी वेगवेगळ्या दिवशी आल्याने दिवसभर गडावर होमाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी राहणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे मंदिरे बंद असल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र, यंदा निर्बंधमुक्त उत्सव असल्याने नवरात्रीचे नऊ दिवस गडावर गर्दी होती. शनिवारी आणि रविवारी गडावर उच्चांकी गर्दी झाली होती. यात्रा काळात किमान चार लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. या वर्षी भाविक मोठ्या संख्येने आल्यामुळे व्यावसायिक आनंदित होते. कार्ला गडावर पारंपारिक हार फूले विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या विक्रेत्यांसोबत इतर साहित्यांची दुकाने वाढली आहेत. रिक्षाचालकांचा देखील चांगला व्यावसाय झाला. गडावर येणाऱ्या भाविकांना योग्य पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. स्थानिक पोलीस व मुख्यालय बंदोबस्त असे दीडशेहून अधिक पोलीस जवान, महिला पोलीस तसेच अधिकारी आणि विविध पथके तैनात होती. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे देवीचा नवरात्र उत्सव पार पडला.