शहरातील फ्लेक्सबाजी तर कधी अनोख्या पद्धतीचे आंदोलनामुळे पुणे शहर नेहमीच चर्चेत असते. पण आता पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्‍या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत.

पुणे महापालिकेत २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भाजपाच्या हाती सत्ता दिली. मात्र मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून कोणत्याही योजना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यात अपयश आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही, दांडेकर पूल येथे कालवा फुटीची घटना, शहरात अनेक भागात खड्डे, यासारख्या समस्या आहेत असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसारख्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत समस्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झालं आहे. यासह अनेक प्रश्नावर अनेक वेळा सभागृहात किंवा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाची पोलखोल स्पर्धा जाहीर केली आहे.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
Rashtriya Janata Dal Lalu Prasad Yadav Muslim-Yadav Loksabha Election 2024 RJD Bihar List
मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?
odisha bjp lok sabha campaign
अभिनेते आणि खासदार अनुभव मोहंती आता भाजपाच्या मंचावर
Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

नक्की पाहा हे फोटो >> Photos: आफ्रिकेमधील सर्वोच्च शिखरावर ‘जाणता राजा’; उणे २० डिग्रीमध्ये पुण्यातील बापलेकीनं फत्ते केली मोहीम

आपल्या परिसरातील समस्या संबधित व्यक्तीने व्हिडिओ किंवा फोटो #polkholpune या हॅशटॅगवर पोस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या व्हिडिओ आणि सेल्फी फोटोला प्रत्येकी ११,१११ रुपये असे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

आता या स्पर्धेला पुणेकर कसा प्रतिसाद देतात, हे येत्या काळात स्पष्ट होईल.