माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पिंपरीत आयोजित जागतिक मराठी संमेलनात मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो आहे, असे स्पष्टपणे सांगितले. शरद पवार यांनी तोच धागा धरून आपल्या भाषणात उल्लेख करत मला त्यांची भीती वाटते कारण कोणीतरी म्हटलं होतं की मी शरद पवार यांच बोट धरून राजकारण आलोय. तेव्हा पासून मी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी घाबरतो, असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता टोला लगावला आहे. ते पिंपरीत जागतिक मराठी संमेलनात बोलत होते. पिंपरी च्या डॉ. डी. वाय. पाटील. विद्यापीठ यांनी हे संमेलन आयोजित केल होत. यावेळी जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना जागतिक मराठी पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सुशीलकुमार शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात जागतिक मराठी संमेलनात शरद पवार यांच मोठं योगदान असल्याचं म्हटलं. ही जागतिक मराठी अकादमी उभी करण्यात पवारांचा मोठा वाटा आहे. जागतिक मराठी अकादमी ही त्यांचीच संकल्पना आहे. असे सांगत शरद पवार हे कुठली स्कीम काढतील, हे सांगता येत नाही असा उल्लेख करताच सभागृहात एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो आहे. ते माझ्या पाठीशी असतात, असं त्यांनी म्हटलं.

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Chandrashekhar Bawankule,
धैर्यशील मोहिते पाटलांच्या राजीनाम्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांचा…”
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray in Ramtek Lok Sabha constituency campaign
बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, ‘हे’ घरगडी समजत होते; एकनाथ शिंदे यांची टीका
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

शरद शरद पवार यांनी हाच धागा धरून म्हणाले की, सुशीलकुमार यांनी बोलता बोलता सांगितलं की मी त्यांच्या तालमीत तयार झालो… याची मला भीती वाटते असं पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की, कोणीतरी म्हटलं होतं की मी शरद पवार यांच बोट धरून राजकारणात आलोय. तेव्हा पासून मी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जायला घाबरतो. असं म्हणत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. यामुळं सभागृहात हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, मराठी भाषेचा व्यवहारात अधिक वापर आणि प्रसार व्हावा. कोणती बोली भाषा बोलावी याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. मराठी बोली भाषेची टिंगल टवाळी केली जाते ती टाळली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांनी बाळासाहेब ठाकरे यांचा तो किस्सा सांगितला

घाशीराम कोतवाल चे कलाकार जर्मनीला कसे पोहचले. हा प्रसंग शरद पवारांनी सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांचा या नाटकाला विरोध होता. त्यामुळं पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या या नाटकातील कलाकारांना पोहचू द्यायचं नाही. असा निश्चय केला अन् पुणे मुंबई मार्गावर खोपोली भागात त्यांना आडवायचे नियोजन आखण्यात आले होते. तेव्हा मी किर्लोस्कर यांचे दोन-तीन विमान मागवले अन् त्यांना पुण्यातून थेट मुंबई विमानतळावर पोहचवले, मग ते विनाअडथळा जर्मनीला पोहचले.