पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच मावळ लोकसभा मतदारसंघावरही राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत आढावा बैठक झाली. त्या वेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात पिंपरी-चिंचवडमधील काही पदाधिकाऱ्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस
हेही वाचा >>> पुणे : नागरी सहकारी बँकांसाठी आता शिखर संस्था; मुख्य कार्यकारी अधिकारीपदी खिरवडकर
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार
मावळ मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला सातत्याने निवडून देण्यात आले आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाकडे सक्षम उमेदवार नाही, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार करता पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्या तुलनेत ठाकरे गटाची या मतदारसंघात कोणतीही ताकद नाही. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी लाखाहून अधिक मते घेतली होती, असे राजकीय गणितही मांडण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा >>> रिंगरोड सुसाट…,जाणून घ्या कशी फुटणार पुण्याची वाहतूक कोंडी
पुणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे, असे सांगत अजित पवार यांनी पुणे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp claims maval loksabha constituency disputes between thackeray group pune print news apk 13 ysh