महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही : अजित पवार

महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याची टीका होत असल्याचंही ते म्हणाले.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जोपर्यंत पाठबळ आहे तोपर्यंत या महाविकास आघाडीच्या सरकारला धोका नाही, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते मावळमध्ये एका हॉटेलच्या उदघाटन प्रसंगी आले होते. तेव्हा त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

“महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे अनेक नेते हे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही अशी टीका करत आले आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र हे सरकार आपलं एक एक पाऊल रोवत पुढे जात असल्याच दिसत आहे,” असं पवार म्हणाले.

“जोपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पावर, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं पाठबळ आहे तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही,” असं स्पष्ट केले. “महाविकास आघाडीचे सरकार राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे व्यवस्थित काम करत आहे. कोणी काय म्हटलंय त्याच्याशी काही घेणं देणं नाही,” असंही अजित पवार म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp deputy chief minister ajit pawar speaks about mahavikas aghadi government criticize bjp kjp 91 jud

ताज्या बातम्या