पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर शरद पवार यांच्या समर्थकांची पिंपरी-चिंचवड शहरासाठी कार्यकारी समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये नऊजणांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सर्व माजी नगरसेवकदेखील अजित पवार यांच्यासोबतच गेले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नऊजणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे. या समितीत सुनील गव्हाणे, इम्रान शेख, काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मयूर जाधव, काशिनाथ नखाते, राजन नायर, शिला भोंडवे यांचा समावेश आहे.

हेही वाचा – दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी; पुण्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – पिंपरी : राहुल कलाटे यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश लांबणीवर; ‘हे’ आहे कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शहरातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थपणे पूर्ण केली जाईल. शहरात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे कार्यकारी समितीचे सदस्य काशिनाथ नखाते यांनी सांगितले.