शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याची चाचपणी सुरू झाली आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबरच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव चर्चेत असतानाच माजी आमदार विलास लांडे यांनीही शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंदर्भात दंड थोपटले आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्षांतर्गतच इच्छुकांची संख्या वाढत असल्याने पक्षनेतृत्वापुढे उमेदवार निवडीचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >>> दहावीतील गुणफुगवटा ओसरला; गुणवंतांमध्ये घट, चार वर्षांतील नीचांकी निकाल

pune aimim, mim lok sabha candidate anis sundke pune
“काँग्रेस पक्षाने ७० वर्षांत मुस्लिम, दलित समाजासाठी काय केले?”, एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंचा पलटवार
sharad pawar group candidate list,
शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; रावेरमधून श्रीराम पाटील, तर साताऱ्यातून…
baramti pattern in raigad
रायगडामध्ये तटकरेंच्या कोंडीसाठी ‘बारामती पॅटर्न’
ajit awar discussed about satara nashik madha constituencies with party workers
सातारा, नाशिक, माढा मतदारसंघांबाबत अजित पवार यांची सावध भूमिका, पुण्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली. पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चाही या बैठकीत करण्यात आली. त्यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही नाव पुढे आल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. दिलीप वळसे पाटील सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. ते पाच जून नंतर येणार आहेत. त्यानंतरच ते शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून लढविण्यास इच्छुक आहेत की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे निवडून लढविणार नसल्याची चर्चा सातत्याने होत असल्याने दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सांगण्यात आले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आहेत. मात्र अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असून त्यांची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबरची जवळीक वाढत आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मात्र डाॅ. कोल्हे भाजपमध्ये जाणार या चर्चेमुळेच दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्र दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात करण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढविली नाही.

हेही वाचा >>> पुणे: यंदाही कोकण विभाग अव्वल

रष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू अशी दिलीप वळसे पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस नक्की कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच माजी आमदार विलास लांडे यांनीही शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लांडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असा उल्लेख असलेले फलक मतदारसंघात उभारले होते. पक्ष नेतृत्व जो उमेदवार देईल, त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे लांडे यांनी सांगितले असले तरी लांडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या मर्जी आणि विश्वासातील आहेत. लांडे यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर अजून शर्यत संपलेली नाही, असे सांगत विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी ते उमेदवारीच्या स्पर्धेत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.